” शेवटच्या श्वासापर्यंत कडेगावकरांची सेवा करणार : नगराध्यक्ष धनंजय देशमुख.”
कडेगांव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या मन हस्ते संपन्न.
कडेगांव : प्रतिनिधी.
राजकारणापलीकडे गट-तट,जात-पात न पाहता संपूर्ण कडेगांव आपले कुटुंब समजून कडेगावचे दिवंगत नेते स्व.आनंदराव देशमुख, स्व.गुलाबराव देशमुख, स्व.सुरेश (बाबा) देशमुख व चंद्रसेन देशमुख यांनी लोकसेवा करून माणसे कमावली त्यांचाच वारसा जोपासत “संपूर्ण कडेगाव शहर माझे कुटुंब ” समजून रात्री अपरात्री जनतेसाठी उपलब्ध राहून लोकसेवा करत असल्याने कडेगांवकरानी दिलेल्या मतदानरूपी आशीर्वादामुळे नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजपचे सरकार आहे, त्यामुळे कडेगावातील प्रत्येक प्रभागातील सर्वसामान्य नागरिकाना निराधार पेन्शन, स्वानिधी,घरकुल सोबत प्रधानमंत्री व नमो शेतकरी सन्मान निधी, महिलांच्या विविध कलागुणांना व्यवसायातून चालना देण्यासाठी शासकीय योजना,दिव्यांगांसाठी अन्य लोककल्याणकारी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबर नगरपंचायतीकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा विकासनिधी उपलब्ध करून शेवटच्या श्वासापर्यंत कडेगावकरांची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन कडेगांवचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले.
ते कडेगांव शहरातील प्रभाग ७ व ११ मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, बांधकाम सभापती पै. अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, नगरसेविका शुभदा देशमुख,नगरसेविका नजमाबी पठाण प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या शहरातील प्रभाग ७ मधील चंद्रसेन देशमुख यांच्या घरापासून संदीप माने घरापर्यंत व प्रताप भोई घर ते दत्तात्रय यादव घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पाईप गटार करणे, प्रभाग ११ मधील पवार नगर ते गुहागर विजापूर महामार्गापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पाईप गटार करणे या विकासकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी नगरसेवक विजय गायकवाड, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड,आशपाक पठाण,हाजी मूकतार पटेल,सुधाकर चव्हाण, चंद्रहास्य देशमुख, श्रीजय देशमुख, रवींद्र पवार अभिजित लोखंडे,रमेश पवार,सतीश पवार, विलास पवार, गणेश देशमुख, अक्षय देशमुख, अक्षय पवार,सचिन आनंदा पवार,अशोक पवार, महेश पवार, मनोज भस्मे, शिवाजी देसाई, महेश पाटील, संभाजी देसाई, शांताराम दीक्षित,जगदीश लोखंडे,किशोर मिसाळ,दत्ता शिंदे, वैभव भोसले, रोहित चन्ने, दिग्विजय देशमुख, रोहित देशमुख, सुरज देशमुख, प्रकाश मोरे, लाला निकम,यांच्या सह कडेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
…
“