तडसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शिवतीर्थ वर मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळा संपन्न
आमदार डॉ.विश्वजित कदम ,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
कडेगांव : प्रतिनिधी
तडसर (ता. कडेगाव) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे हजारो शिवभक्तच्या उपस्थित मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळा पार पडला.
या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी आमदार डॉ. विश्वजीत कदम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. पृथ्वीराज (बाबा) देशमुख , युवा नेते शरद लाड सभापती डॉ.जितेश कदम, प्रांताधिकारी रणजीत भोसले तहसीलदार अजित शेलार,सहा.पोलिस निरीक्षक राहुल घुगे, अर्चना मोहिते,श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव,साहितीक संपत मोरे,प.स.सदस्य पै.रणजीत पवार प्रमुख उपस्थित होते.
तडसर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने गेल्या सुमारे ८० वर्षांपासून यात्रा भरविण्याची परंपरा आहे. गावातील नागरिकांच्या मागणीनुसार सन २०१९ मध्ये ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर सर्व शासकीय परवानग्या घेऊन ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी उभारला
ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ६ एप्रिल रोजी अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदायाच्या सहभागात व फटाक्यांच्या आतषबाजीतून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनंतर पुतळ्याची स्थापना करण्यात आली. पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
कोल्हापूर येथील शिल्पकार संजीव संपकाळ आणि अतुल डाके यांनी साकारलेला ११ फूट ३ इंच उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करण्यात आला. पुतळा गावात आणल्यानंतर ढोल-ताशा पथक, वारकरी संप्रदाय, शिवभक्तांच्या घोषणांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आमदार डॉ विश्वजित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सभापती डॉ.जितेश कदम , समिती संस्थापक हणमंतराव पवार, अध्यक्ष महेश पवार,माजी उपसरपंच सुरज पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच हणमंतराव पवार, सरपंच संजना माळी, उपसरपंच शितल शेळके, सोसायटी चेअरमन अनुपकुमार पवार, माजी चेअरमन प्रविण पवार, ग्रामपंचायत सदस्य विराज पवार, मनोज पवार,सुरज पवार, समिर मुल्ला, महेश होलमुखे, प्रतिभा पवार, प्रविण पवार,मनिषा पवार, भारती जाधव,काजल वायदंडे, सुवर्णा नरुले,माजी उपसरपंच संभाजी शेळके, संजय पवार, समितीचे अध्यक्ष महेश पवार, उपाध्यक्ष पवन पवार, रूतुराज पाटील,सतीश किर्दक, महेंद्र पवार,जगदिश जाधव,शंकर जाधव,अभय गुरव , बाबासाहेब कांबळे, संदिप पवार, राजेंद्र पाटील,
आदीसह नागरिक महिला शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.कदम यांच्याकडून पाच लाख देणगी..
लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास आमदार डॉ विश्वजित कदम यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश शिवस्मारक समितीकडे सुपूर्द केला.