कडेगाव शहरांतील नगरपंचायत इमारतीसाठी ५ कोटीं मंजूर : धनंजय देशमुख.
” नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी भाजपा महायुतीचे सरकारचे मानले आभार.”
कडेगाव : प्रतिनिधी.
कडेगाव शहरातील नगरपंचायत इमारत ही ग्रामपंचायत कार्यकाळातील असल्याने नगरपंचायत प्रशासन कार्य कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नगरपंचायतीसाठी सर्व सोयी सुविधायुक्त इमारत होऊन शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी भाजपाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व शिवसेनेचे नेते डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यातून दि.५ में रोजी नगर विकास मंत्रालयामार्फत इमारतीच्या निधी संदर्भातील शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले असून कडेगाव नगरपंचायतीच्या नवीन प्रशस्त इमारत बांधकामासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती कडेगांवचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले की
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे,उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने नगरपंचायतिची इमारत प्रशस्त व सर्व सोयी सुविधा युक्त अशी वैशिष्ट्यपूर्ण व्हावी यासाठी ५ कोटी कोटींची निधीं मंजूर झाला असून लवकरच इमारत बांधकामाचे काम सुरू होणार आल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली.