लोकनेते आ.संपतराव(आण्णा )देशमुख :टेंभूच्या पाण्यासाठी मंत्रीपद नाकारणारे त्यागी राजकारणी…
१९९५ साली भिलवडी वांगी (आताचे पलूस कडेगाव )या विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा पराभव करत संपतराव देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचा पराभव झालेला आणि शिवसेना भाजप युतीची सत्ता स्थापन होण्यासाठी शक्यता तयार झाल्या होत्या. त्याचवेळी राज्यातील अपक्ष आमदारांनी शिवसेना भाजप युतीला मदत करण्याचा निर्णय घेतला.यावेळी अपक्ष आमदारांपैकी संपतराव देशमुख यांना मंत्रीपद देतो असं आश्वासन युतीचे नेते द्यायला लागले तेव्हा संपतराव अण्णा म्हणाले,”मला मंत्री करू नका.पण मी ज्या भागातून आलोय त्या भागातील पाणी योजनांना निधी द्या.मला मंत्री होण्यासाठी जनतेने निवडून दिले नाही तर त्यांना पाणी हवे आहे.”असं म्हणत त्यांनी युतीने मंत्रिपदाची दिलेली ऑफर नाकारली..
कराडमध्ये वकिलीचा व्यवसाय करत अण्णा राजकारणात आले. सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून त्यांनी केलेल्या कामाची लोक आजही आठवण काढतात..
१९९५ साली काँग्रेस पक्षात ठीकठिकाणी बंडखोरी झाले. बंडखोरीची लाट आली म्हणा की,या लाटेत संपतराव अण्णा आमदार झाले. आणि मंत्री होणं शक्य असतानाही त्यांनी मंत्रीपद नाकारले. जनतेला पाणी मिळावे म्हणून मंत्रीपदाची ऑफर नाकारली
कधीकाळीशेतात,माळरानात,विहिरीत, दीवाळी झाली की साध पक्षांना पिन्यासाठी पाणी नसायचे,त्या शेत शिवारात जिकडे पाहावं तिकडे पाण्याचे पाट वाहत आहेत.
टेंबु योजनेमुळे आज शिवरात ऊस आला.आज त्या ऊसाचे विक्रमी उत्पादन घेत आहोत .ते शक्य झाल टेंबु योजनेचे जनक स्व.संपतराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नामुळे आणा आज उसाच्या प्रतेक मोळी गणीस तुमची आठवण येते की टेंभू चे पाणी शिवारात आले पासून गावची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाण वाढली आहे.कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दारात बलेरो गाडी दिसावी हे स्वप्न आणानी पहिलेले खर होताना दिसत आहे.