अंबक येथे बिबट्याच्या संरक्षणासाठी महादेव पाटील यांनी केला आगळा वेगळा प्रयोग
संपादकीय
अंबक ता.कडेगाव येथील महादेव पाटील यांनी बिबट्याच्या संरक्षणासाठी आगळा वेगळा प्रयोग केल्याने त्याची चर्चा या परिसरात रंगु लागली आहे
महादेव पाटील यांचे वडिल नागनाथ पाटील हे वांगी देवराष्टे रोडवरील अंबकच्या कावढू वस्तीवरती राहत आहेत त्यांनी आपले वडील नागनाथ पाटील यांचा बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी खाटेला चारी बाजुंनी जाळी मारली आहे त्यांचे वडिल हे वयोवृद्ध असुन त्यांचे मातीशी प्रेम आहे त्यामुळे ते आपल्या कावढु परिसरातील वस्तीवरतीच रहाणे पसंत करतात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांनी सोनहिरा खोर्यात दशहत माजवली आहे तसेच त्यांची दोन कुत्री ही बिबट्याने डोळ्या देखत फस्त केली आहेत या प्रसंगाने मानवी बचावाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महादेव पाटील यांनी आपल्या वडिंलासाठी झोपण्यासाठी असणार्या खाटेला चारी बाजुंनी अंगल लावून जाळी मारली आहे आणी आतमध्ये ये जा करण्यासाठी दार केलेले आहे त्यामुळे कोणत्याही स्वरूपामध्ये बिबट्या पासून बचाव होऊ शकतो त्यामुळे वडिलांसाठी पुर्णता संरक्षण होण्यासाठीची यंत्रणा त्यांनी उभारली आहे या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची चर्चा सर्वत्र होत आहे