कडेगाव तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी
कडेगाव : वृत्तसेवा
कडेगाव शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली.यानिमित्त कडेगाव येथील इदगाह मैदनावर मुस्लिम बांधवांच्या वतीने सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली .यावेळी विश्वशांतीसाठी तसेच सर्वच धर्मात, जाती पातीमध्ये एकोपा कायम रहावा , महामारी सारखे आजार दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
कडेगाव शहरासह कडेपूर,शाळगाव,वांगी,अमरापूर,देवराष्ट्रे,चिंचणी,नेर्ली,तडसर आदी गावासह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली.कडेगाव येथे सकाळी 8 वा. सय्यदपिर साहेबहुसेन पिरजादे यांच्या खानकाजवळ सर्व मुस्लीम बांधव एकत्रित येवून नमाजसाठी कडेगाव-निमसोड रस्त्यावरील इदगाह मैदानावर गेले.त्याठिकाणी कडेगाव सुन्नी शाही जामा मस्जिदचे पेश इमाम हाफिज मंजर अली यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली.यावेळी कडेगावसह परिसरातील सुमारे पाच हजार हुन अधिक मुस्लीम बांधव एकत्रित आले होते.यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने माजी कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, माजी आ.मोहनराव कदम,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख , सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ जितेश कदम , पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय कदम , क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड , नगराध्यक्ष धनंजय देशमुख ,विरोधीपक्ष नेते विजयराव शिंदे , जेष्ठ नेते सुरेश थोरात, दीपक भोसले ,चंद्रसेन देशमुख ,प्रांताधिकारी रणजित भोसले ,तहसीलदार अजित शेलार, सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख , संतोष डांगे ,सर्व नगरसेवक यांच्यासह आदींनी शुभेच्छा दिल्या.